बोर खाण्याचा मोह पडला महागात, १० दिवस होता विहिरीतच...वाचा पुढे काय झाले

Foto

औरंगाबाद- विहिरीच्या काठावरील बोरांचा मोह एका १८ वर्षीय तरुणाला चांगलेच महागात पडले. बोर तोडण्याच्या नादात पाय घसरून तो कोरड्या विहिरीत पडला आणि चक्क अन्नपाण्याशिवाय तो १० दिवस उपाशी राहिल्याची घटना गंगापूर तालुक्यातील माळीवाडा येथे घडली. ग्रामस्थांनी तरुणास विहिरीबाहेर काढले.

 

धर्मदास उविके वय १८ वर्षे (रा.माळीवाडा गायरान, ता गंगापूर) असे विहिरीत पडलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अधिक माहिती अशी की, धर्मदास हा १० दिवसांपूर्वी  गावाजवळील तलेसमान या ठिकाणी गेला होता. तेथे दाट झाडामध्ये एक बोराचे झाड होते.झाडांना बोर लागल्याचे पाहून बोर खाण्याचा मोह न अवरल्याने तो झाड जवळगेला बोर तोडण्याच्या नादात पाय घसरून तो कोरड्या विहिरीत पडला. या मुळे त्याच्या हात व पायाला गंभीर जखमी झाली.

 

परिसर निर्मनुष्य असल्याने त्या ठिकाणी कोणीही जात नाही. शनिवारी संध्याकाळी गावातील एक गुराखी तेथे गेलं असता, झुडुपांच्या आड असलेल्या विहिरीतून आवाज येत असल्याने गुराखी ने विहिरी जवळ जाऊन पाहिले असता तरुण त्या ३०  फूट खोल विहिरीत पडल्याचा प्रकार समजल्यानंतर त्याने गावकर्यांच्या मदतीने बजेला दोरी बांधून धर्मदास ला बाहेर काढले. त्यावर माळीवाडा येथील खाजगी रुग्णालायत उपचार सुरू आहेत.